चांदवड : तालुक्यातील देणोवाडी शिवारात शेती गट नंबर १८७ दोन महिन्यांच्या कांदा पिकावर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत टू फोरटी नावाचे औषध फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद शेतकरी बळीराम प्रभाकर ढगे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दाखल केली.त्यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित शंकर बाबूराव ढगे, विक्रम बाबुराव ढगे, अशोक पंढरीनाथ ढगे, बापू वसंत ढगे (सर्व रा. देणोवाडी) यांनी शेतात कांद्याचे पीक लावले होते. बळीराम ढगे व इतर ढगे परिवार यांची शेतजमीन शेजारी शेजारी असल्याने शनिवारी (दि.६) रात्रीतून त्यांनी कांदा पिकावर गोल औषधाची फवारणी केल्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला बळीराम ढगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेवाळे हे करीत आहेत.चांदवड तालुक्यातील देणोवाडी शिवारात कांदा पिकावर तणनाशक मारल्याचे दिसत आहे.
कांदा पिकावर तणनाशक औषधाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 12:13 AM
चांदवड : तालुक्यातील देणोवाडी शिवारात शेती गट नंबर १८७ दोन महिन्यांच्या कांदा पिकावर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत टू फोरटी नावाचे औषध फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद शेतकरी बळीराम प्रभाकर ढगे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दाखल केली.
ठळक मुद्देगुन्हा दाखल : देणोवाडी शिवारात दोन ते तीन लाखांचे नुकसान