मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. मात्र आजही शहरांमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. सरकारने जाहीर केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनला ग्रामिण भागात पाठींबा असल्याचे दिसत आहे.बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी गावाला सॅनेटाईझ करण्यासाठी मोफत औषधाचा पुरवठा केल्याने संपूर्ण गावात औषधाची फवारणी करण्यात आली. यापुर्वी दोन वेळा ग्रामपंचायतीने स्वखर्चातुन औषध फवारणी केली असुन ग्रामस्थांना घरातच रहाण्याचे आवाहन सरपंच प्रमिला पवार, उपसरपंच संजय जाधव आणि पोलीस पाटील दिपक सुर्यवंशी आदीकरीत आहेत.गावातील किराणा दुकान सकाळी दोन व सायंकाळी दोन तास उघडत असत, मात्र काही दुकानदारनियमांचे पालन करीत नसल्याचे दिसताच पोलीसांना सांगून त्यांना समज देण्यात आली. त्या नंतर ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन गर्दी टाळण्यासाठी सकाळी सात ते दहा या वेळेत जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किरणा दुकान उघडण्यात येत आहेत.तसेच गावात वेळोवेळी दवंडी देऊन शासनाच्या आदेशांची माहीती ग्रामस्थांना देण्यात येत आहे. पुणे-मुंबईहून आलेल्या नागरीकांना घराबाहेर पडू नये यासाठी सुचना देण्यात येत आहेत.भाजीपाला गावातच विक्र ी करण्यात येत असल्यामुळे नागरीकांना अडचण निर्माण होत नाही. गावातील गरिब कुटूंबांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. तसेच इंदिरानगर वसाहतीत विकली जाणारी गावठी दारूची विक्र ी बंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण गाव लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर मुंजवाडसह परिसरात कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. कांदा लागवडीचे क्षेत्र मोठया प्रमाणात असल्यामुळे व या वर्षी सिमा बंद केल्याने तसेच वाहनांमधुन सुरक्षीत अंतर ठेऊन येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
मुंजवाड येथे फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:13 PM
मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. मात्र आजही शहरांमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. सरकारने जाहीर केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनला ग्रामिण भागात पाठींबा असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनला ग्रामिण भागात पाठींबा