कवडदरा : साकूर, पिंंपळगाव डुकरा परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून फवारणी करण्यात आली.इगतपुरी तालुक्यातील साकूर परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हायपो- क्लोराइड पावडरची फवारणी करण्यात येत आहे. परिसरात कारखाना, गृहउद्योग, सरकारी बॅँका, पतसंस्था, किराणा दुकाने, खते, बी-बियाणे दुकाने, शाळा-महाविद्यालये उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर मानला जातो. यामुळेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हायपोक्लोराइड निर्जंतुकीकरण पावडर वापरून संपूर्ण परिसरात फवारणी करून उपाययोजना करण्यात आली. गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसेवक नीतेश हेमाडे, आरोग्य सेविका जयश्री गिरी, सरपंच मालन भगवान वाकचौरे, उपसरपंच जिजाबाई गणपतराव भगत, पुष्पा कडभाने, भाऊसाहेब कडभाने, परशराम वाकचौरे, आशाबाई डुकरे, हिरामण चिकणे, रामभाऊ भगत, एकनाथ कुंदे, मारुती भगत, आशा सेविका विजया जाधव विशेष काळजी घेत असून, गावातील गरीब, गरजू कुटुंबातील लोकांना खाद्य पदार्थ, किराणा वाटप सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कडभाने व मित्र परिवाराकडून करण्यात येत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी साकूर येथे फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:24 PM