नाशिक : अभिनेत्री श्रीदेवी यांनी चार वर्षांपूर्वी नाशिकला एका गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली आणि नाशिकचे निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक वातावरण एवढे भावले की, त्या शहराच्या प्रेमातच पडल्या. त्यांनी लगेचच त्या प्रकल्पात एक घरही बुक केले आणि सुट्यांमध्ये नाशिकला वास्तव्य करणार असल्याचा शब्दही त्यांनी नाशिककरांना दिला होता. मात्र, दुर्दैवाने त्यांचे नाशिककर होण्याचे स्वप्न खरे ठरले नाही. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २७ मे २०१३ रोजी श्रीदेवी यांनी पाथर्डी फाटा येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली होती. श्रीदेवी या प्रकल्पाला भेट देणार असल्याचे समजल्यानंतर नाशिककरांनी त्याठिकाणी एकच गर्दी केली. सामान्य आणि उच्चभ्रू नागरिकांप्रमाणेच सारेच जण त्यांची प्रतीक्षा करीत होते. शेतकरी, मजूर, तसेच महिला रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसल्या होत्या. फिक्कट केशरी रंगाची साडी परिधान करून आलेल्या श्रीदेवी यांनी साºयांचीच मने जिंकली. पती बोनी कपूरसह आलेल्या श्रीदेवी या येथील निसर्गरम्य वातावरण आणि नाशिककरांचे प्रेम बघून अक्षरश: भारावून गेल्या होत्या. त्यांनी नाशिकमध्ये राहायला आवडेल, असे सांगताना पती बोनी कपूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकचे घर गिफ्ट केले होते. यावेळी त्यांनी घर बुकिंग करण्यासाठी लगेचच संबंधित प्रकल्प अधिकाºयांकडे आठ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. श्रीदेवी नाशिककर होणार असल्याची वार्ता त्यावेळी लगेचच सबंध शहरामध्ये पसरली होती. दरम्यान, श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाने त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले आहे. जेव्हा श्रीदेवी यांच्या निधनाची वार्ता समजली तेव्हा नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. त्याचबरोबर श्रीदेवी नाशिककर होणार असल्याच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.त्र्यंबकला केली होती कालसर्प शांतिपूजासुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी व त्यांचे पती बोनी कपूर कुटुंबासह बारा वर्षापूर्वी दि.१० जून २००६ त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली व कालसर्प पूजा हा तीन दिवसांचा विधी करण्यासाठी आले होते, अशी आठवण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेदमूर्ती सतीश वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. आजारपणामुळे माझे मोठे बंधू रवींद्र वैद्य आता जास्त बोलू शकत नाहीत. पण त्या वेळेस बोनी कपूर फॅमिलीची कालसर्प व नारायण नागबली पूजा आम्हीच दोघा भावांनी केली होती. त्यांचा मुक्काम नाशिक येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. तेथून ते रोज पूजेसाठी येत असत. कालसर्प पूजा घरात तर नारायण नागबली पूजा स्मशानात होत असते. कपूर कुटुंब सेलिब्रिटी असल्याने लोकांची गर्दी होईल म्हणून त्यांची पूजा येथील दीक्षित यांच्या बंद खोलीत करण्यात आली होती, अशी माहिती सतीश वैद्य यांनी दिली.बिजली गिराने मै हूँ आयीकेशरी रंगाची साडी परिधान करून आलेल्या श्रीदेवी यांची एक झलक टिपण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यामध्ये महिला वर्गाचा मोठा सहभाग होता. वास्तविक जेव्हा श्रीदेवी नाशिकमध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांचा बºयाच काळापासून एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. परंतु अशातही त्यांच्याबद्दलची क्रेझ तसूभरही कमी झाली नव्हती. पाथर्डी फाटा या परिसरात शेतीकाम करणाºया महिलांनी तर हातचे काम सोडून श्रीदेवीची झलक बघण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडले होते.
श्रीदेवीला व्हायचे होते नाशिककर, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:15 AM
नाशिक : अभिनेत्री श्रीदेवी यांनी चार वर्षांपूर्वी नाशिकला एका गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली.
ठळक मुद्देनाशिकला वास्तव्य करणार असल्याचा शब्दश्रीदेवी यांनी साºयांचीच मने जिंकली श्रीदेवी नाशिककर होणार असल्याची वार्ता