शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

दहावीत बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरीची यशस्वी भरारी

By suyog.joshi | Published: May 27, 2024 3:42 PM

ज्ञानेश्वरी लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असे, त्याच्यातूनच तिला खऱ्या अर्थाने भजनाची आवड निर्माण झाली.

संजय शहाणे

नाशिक : घरची हलाखीची परिस्थिती. यातही गावोगावी कीर्तन करत उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत येथील डे केअर सेंटर शाळेची विद्यार्थिनी व बालकीर्तनकार ज्ञानेश्वरी भोजदरे हिने दहावीत ८३ टक्के गुण मिळवित यश संपादन केले. महाराष्ट्रात गावोगावी कीर्तन करून मिळणाऱ्या मोबदल्यातून ज्ञानेश्वरी कुटुंब चालवण्यासाठी आई-वडिलांना मदत करते. ज्ञानेश्वरीची घरची परिस्थिती तशी गरिबीचीच आहे. वडील एका कंपनीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करतात. आई घरकाम करते. तिला दुसरे भावंड नाही. ती एकटीच मुलगी आहे.

वडिलांना वारकरी संप्रदायाची आवड असल्याने ते चांगले भजन करतात. त्यांचे गायनदेखील चांगले आहे. ज्ञानेश्वरी लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असे, त्याच्यातूनच तिला खऱ्या अर्थाने भजनाची आवड निर्माण झाली. ती इयत्ता ९वी आणि १०वी मध्ये असताना प्रवचन आणि कीर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. अशावेळी मात्र ती शाळेत येऊ शकत नव्हती. उत्कृष्ट बाल कीर्तनकाराच्या यादीमध्ये तिचे नाव नंबर १ ला आहे. तिच्या या कीर्तनाच्या सेवेतून तिला चांगला आर्थिक मोबदलासुद्धा मिळत आहे आणि आपल्या वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी मदत करत आहे. एवढ्या लहान वयात तिने स्वतःला सिद्ध केले आहे. तिच्या या कर्तृत्वामुळेच तिने बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, मुख्याध्यापक वासंती पाठक, सह शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्रभर कीर्तनेआठवड्यातील दोन ते तीन दिवस तिचे प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम हमखास असायचा. ती कधी अर्धा दिवस शाळेत यायची. कधी कधी तर दोन-तीन दिवस शाळेत यायची नाही. तरीदेखील ती आपला गृहपाठ, स्वाध्याय, परीक्षा यासाठी ती वेळ काढायची. वेळेत सर्व पूर्ण करत असे. ती महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि उत्कृष्ट असे कीर्तन करते.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालNashikनाशिक