नाशिक: घशाला त्रास आणि अंगात थोडा ताप असल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात तपासणीसाठी आलेला एस.टी महामंडळाचा चालक रूग्णालयाच्या प्रवेशद्वारात पडून त्याचा काही क्षणात मृत्यू झाल्याने संपुर्ण यंत्रणा हादरून गेली आहे. मृत्यूनंतर सदर कर्मचाऱ्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असून महामंडळाने मात्र सावध भु मिका घेत स्पष्ट काहीही सांगण्यास नकार दिला.मिळालेल्या माहितीनुसार मयत कर्मचारी हा परप्रांतीय प्रवाशांना घेऊन मध्यप्रदेशातील सीमेवरील ड्युटी करून परतला होता. त्याने यापुर्वीही परप्रांतीय प्रवासी घेऊन जाण्याची ड्युटी केली असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. शनिवारी दुपारी आपली ड्युटी संपवून घरी परतलेल्या कर्मचाºयाला त्रास होऊ लागल्याने त्यांचे कुटूंबिय त्यांना घेऊन खासगी डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालात जाण्याचा सल्ला दिला. मात्र रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर दुर्देवी प्रकार घडला. संबंधित कर्मचारच्या मृत्यमुळे महामंडळातील कर्मचांरी मात्र भयभीत झाले आहेत.सदर कर्मचाºयाचे वय हे ५० पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. ५० वर्षाेवरील कर्मचाºायाला ड्युटी देण्यात येऊ नसे असा नियम असतांनाही महामंडळाच्या अधिकाºयांनी त्यास मध्यप्रदेशातील सीमारषेवर परप्रांतीय प्रवासी घेऊन जाण्याची ड्युटी लावल्याची चर्चा कर्मचारी वर्गात सुरू आहे. ड्युटी न करणाºया कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याने कर्मचारी ड्युटी करीत असल्याचे कर्मचारºयांमध्ये बोलले जात आहे.दरम्यान, या घटनेंतर संबंधीत कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी महामंडळाने अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्याचा टाळले तसेच ड्युटी संपवून घरी गेल्याने महामंडळाकडून माहिती दिली जाणार नसल्याची देखील भुमिका घेण्यात आली मात्र या प्रकरणी अधिकाºयांनी शहरातील एका आमदाराची मध्यस्थी घेतल्याची चर्चा देखील सुरू आहे.सदर कर्मचाºयाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असे काही अधिकारी कर्मचाºयांना सांगत आहेत. अधिकृत अहवालानंतरच चालकाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. परंतु गेलय दोन तीन दिवसांपासून डेपो क्रमांक १ येथे सदर कर्मचारी वावरत असल्याने कर्मचाºयांनी सर्व कर्मचाºयांच्या आरोग्याची तपासणी करावी अशी मागणी एस.टीच्या अधिकाºयांकडे केली आहे.-------------------आमदाराची मध्यस्थी कशाासाठीचालकाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाºयांनीऌ एस.टीच्या अधिका-यांना या प्रकरणी विचारणा करण्यास सुरूवात केली. मात्र त्यांनी कर्मचा-यांना अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. आरोग्य विभागाने देखील आरोग्य विषयक चौकशी केली असता शाहरातील एका आमदारची मदत एस.टीच्या अधिका-यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र संबंधित चालकाची कन्या डॉक्टर असल्याने त्यांच्या पुढाकारामुळे चालकाचा स्बॅब नमुना घेण्यात आला आहे. आता अहवालानंतर घटनेतील स्पष्टता समोर येणार आहे.
एस.टी. चालकाच्या मृत्यूने तर्कवितर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:08 PM