बाहेरून आगारात येणाऱ्या व आगारातून बाहेर जाणाऱ्या बसेस कर्मचाऱ्यांनी अडविल्याने दुपारनंतर शहरातील बससेवा काही काळ खंडित झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बसफेऱ्या कमी करण्यात आल्याचे एस.टी. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी वाहक व चालकांना दोन-दोन दिवस ड्यूटी मिळत नसल्याकारणाने तासन्तास आगारातच बसून राहावे लागते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बसफेऱ्या मिळत नसल्याने चालक व वाहकांच्या वेतनावर परिणाम होत असल्याने गुरुवारी कर्मचाऱ्यांचा बांध फुटला. शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन दुपारी बारा वाजल्यानंतर आगारातून बाहेर पडणाऱ्या आणि आत येणाऱ्या बस रोखत आंदोलन करीत एस.टी.. प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
(फोटो डेस्कॅनवर)