सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.आज सकाळी ११ वाजता येथील बस आगाराच्या आवारात ‘न्याय्य हक्कासाठी एकत्र लढा, कामगार एकजुटीचा विजय असो’ अशी घोषणाबाजी करत कामबंद करून कर्मचारी संपात सहभागी झाले. संपात एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, चिटणीस राहुल देवरे, इंटकचे अध्यक्ष शशी गरुड, सचिव पोपट बच्छाव, कास्ट्राईबचे अध्यक्ष जगन मोहिते, चिटणीस निंबा बच्छाव, जे.डी. खैरनार, गोटू पाटील, माजी अध्यक्ष हरिभाऊ रौंदळ, अविनाश सांगळे, बाळू सोनवणे, विष्णू गोसावी, दिलीप जाधव, धनंजय सोनवणे, अजय भामरे, बाबा मन्सुरी, जे.जे. पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते.व्यावसायिकांना आर्थिक फटकाएस.टी. कर्मचाºयांच्या अचानक काम बंद आंदोलनामुळे सुट्टीवरून परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे बघायला मिळाले. या आठवड्यात शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया-जाणाºया प्रवाशांचे हाल होऊन खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. डांगसौंदाणे, मानूर, साल्हेर, हरणबारी, मुल्हेर, नामपूर, मालेगाव, ताहाराबाद, अहवा, साक्र ी, तळवाडे दिगर, गोळवाड, नांदीन, बिलपुरी, चिराई येथील बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.४या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांची चांगलीच चंगळ होती. प्रवासी वाहतूकदारांनी दुपटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर झालीच, त्याबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. बस आगारातील तसेच आवारातील व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसला.
एसटी बंदने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:29 AM
सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देसंमिश्र प्रतिसाद सटाणा, लासलगाव येथे कडकडीत बंद कर्मचाºयांचा अचानक संप