नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आरामदायी वातानुकूलित बसला डेपोत सहज शिरता यावे यासाठी डेपो क्रमांक एकचे प्रवेशद्वार तोडण्यात आले असून, प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाची कॅबिनही तोडावी लागली आहे. विशष म्हणजे डेपोत आता शिवशाही बसेसला थांबण्यासाठी स्वतंत्र जागा केली जाण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागासाठी सुमारे ३७ शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता नाशिकच्या सेवेत टप्प्याटप्प्याने शिवशाही बसेस नाशिकमध्ये आणण्यात आल्या. या सर्व बसेस नाशिक डेपो क्रमांक एक येथील वर्कशॉपमध्ये उभ्या केल्या जातात. परंतु या बसेसला स्थानकात वळण्यासाठी होणारी अडचण आणि कमी पडणारी जागा लक्षात घेता संरक्षक भिंतीसह येथील प्रवेशद्वारच तोडण्यात आले आहे.
एस.टी. महामंडळ : डेपो १ चे प्रवेशद्वार, सुरक्षा कॅबिनही तोडले शिवशाहीचा मार्ग होणार ‘प्रशस्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:50 AM