शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

एस.टी. बस तिकिटांच्या अपहाराचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:44 AM

राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहे.राज्य परिवहन महामंडळाने अनेक बदलांच्या घोषणा आणि उपाययोजना करण्याबरोबरच मदतीसाठीचे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र त्यांच्या या घोषणांमुळे त्यांना टीकेलाच अधिक सामोरे जावे लागले आहे. सफाई व्यवस्थेचे कंत्राट असो की शिवशाही बसेसचे अपघात, कोट्यवधींची मदत, तिकिटाचे खासगीकरण आणि अपघातांविषयी लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केले असताना आता तिकिटातील अपहारावरदेखील तारांकित प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील अनेक आमदारांनी महामंडळातील तिकीट अपहाराबाबत महामंडळाकडे विचारणा केलेली आहे. राज्य परिवहन महामंडळातील वाहकांकडून तिकिटाचा अपहार होत असल्याची सुमारे २९,००० प्रकरणे एप्रिल महिन्यापर्यंत दाखल झाली आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अपहाराची प्रकरणे दाखल झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडल्याचादेखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महामंडळाचे उत्पन्न जर अशा प्रकरणांमुळे कमी होणार असेल तर या गैरप्रकाराविषयी राज्यातील व्याप्ती मोठी असू शकते. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील आगार प्रमुखांकडून तिकीट अपहाराच्या प्रकरणांची माहिती मागविण्यात आलेली आहे.संबंधित प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सर्व आगारांनी १५ एप्रिल रोजीची अपहाराची प्रलंबित प्रकरणे किती? वाहकांची एकूण प्रलंबित प्रकरणे किती? मे अखेरपर्यंत एकूण अपहाराच्या प्रकरणांची माहितीदेखील मागविण्यात आलेली आहे. राज्यातील राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांच्याकडून संपूर्ण माहितीचा तपशील मागविण्यात आलेला आहे.नाशिकमध्ये १५ प्रकरणे?मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभागात एप्रिल महिन्यात प्रलंबित प्रकरणांची संख्या १५ असल्याचे समजते. तर वाहकांची एकूण प्रकरणेदेखील १५ आहेत. यापूर्वी डेपो क्रमांक १ मधील कर्मचाऱ्याच्या आदेशामुळे घडलेल्या अपघात प्रकरणीदेखील माहिती मागविण्यात आलेली होती. मात्र येथील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुरेशी माहिती न दिल्यामुळे संबंधितावर कारवाई होता होता वाचली. कर्मचाºयांच्या संदर्भात अनेक प्रकरणे ही डेपोस्तरावरच रफादफा केली जात असल्यामुळे येथील गैरप्रकारांना वरिष्ठ अधिकाºयांचादेखील आशीर्वाद आहे का अशी चर्चा मात्र लपून राहिलेली नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीstate transportएसटी