नाशिक : शासनाने राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहकांना २५ टक्के पगारवाढ करून द्यावी, या मागणीसाठी राज्य एस.टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने बुधवारी (दि.१६) मध्यरात्रीपासून संप पुकारला. त्यामुळे आज सकाळी शहर व परिसरातील बस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या बस वाहतुकीसह शहर बससेवेलाही ‘ब्रेक’ लागला. शहरातील स्थानकांमध्ये संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसच्या चाकांची हवा सोडून जोरदार घोषणाबाजी केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.इंटकच्या संपामध्ये शहर परिसरातील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला सुमारे साठ लाखांचा तोटा सहन करावा लागला. नाशिक परिवहन मंडळाच्या आगार एक व दोनमध्ये एकूण तीनशे बसेस ‘शोभेच्या बाहुल्या’ म्हणून उभ्या होत्या. चालकांनी बसेसला किल्ली लावणे, तर वाहकांनी ‘डबल बेल’ देणे पसंत केले नाही त्यामुळे बसेस आगारातून बाहेर पडू शकल्या नाहीत. इंटकने पुकारलेल्या संपामध्ये बहुतांश चालक-वाहक सहभागी झाले तरी राज्य एस.टी.कामगार संघटनेने मात्र या संपाला विरोध दर्शवित नियमितपणे कामावर हजर राहण्याचा फलक आगार एकमध्ये झळकविल्याचे दिसून आले. पगारवाढ, वेतनवाढीचा करार लांबणीवर पडल्याने गेल्या महिन्याभरात सुमारे चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या केल्या. त्यामुळे इंटकने आक्रमक होत बेमुदत संप पुकारला आहे. चक्का जाम आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी परवड झाली. जे कामगार संपात सहभागी झाले त्यांनी जुने मध्यवर्ती बसस्थानक, मेळा बसस्थानक, महामार्ग स्थानकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत ऐच्छिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहक-चालकांनाही दमबाजी क रत त्यांच्या बसेसच्या चाकांची हवा काढून ‘खोळंबा’ केला. ेशहर बससेवाही विस्कळीत झाल्याचे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीची चाके थांबली
By admin | Published: December 17, 2015 11:50 PM