लासलगाव : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. सकाळी २४ प्रवासी बस फेºया झाल्या असुन १५० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची गैरसोय झाली आहे. हा संप मान्यता प्राप्त एस.टी कामगार संघटनातर्फे पुकारला आहे. शालेय हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची व प्रवाश्यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एस टी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. आज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही. जे चाकरमानी ग्रामिण भागातून खरेदी साठि येत आहे अश्या प्रवाशांचे हाल झाले.लासलगाव डेपोत बस उभ्या करत कर्मचारी पूर्णपणे संपात सहभागी झाले आहेत. लासलगाव एसटीच्या आगारात साधारण १५० कर्मचारी आहेत. आणि बहुतांश कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेतला आहे.तसेच या आगरातून साधारणपणे एका दिवसाला सोळा हजार किलोमिटर बस चालते तसेच एका दिवसाला चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न जमा होते मात्र एसटी वाहतूक ठप्प झाल्याने एसटीचं उत्पन्न बुडणार आहे. अचानक होणाºया या संपाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच ऐन गर्दीत राज्यभर एस टी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटीच्या संपामुळे प्रवाश्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:43 PM