शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गटबाजीने केला घात, उद्योग विकासला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:49 AM

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी एकता पॅनलच्या गटबाजीला कंटाळलेल्या सभासदांना पर्याय मिळाल्यानेच उद्योग विकास पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर उद्योग विकास पॅनलने सत्ताधाºयांना धूळ चारली आणि आयमा निवडणुकीतील वचपा काढून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी एकता पॅनलच्या गटबाजीला कंटाळलेल्या सभासदांना पर्याय मिळाल्यानेच उद्योग विकास पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर उद्योग विकास पॅनलने सत्ताधाºयांना धूळ चारली आणि आयमा निवडणुकीतील वचपा काढून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. सत्तेत आलेल्या उद्योग विकास पॅनलमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आलेले आहेत. आता एका विचाराने त्यांना काम करून सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करावा लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांसह तीन जण निवडून आल्याने आता राज्यातील त्यांच्याच पक्षाच्या सत्तेतून नाशिककरांच्या हाती काय लागते हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  निमाच्या निवडणुकीपूर्वी आयमाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकता विरु द्ध (केवळ तुषार चव्हाण यांच्या अध्यक्षपदासाठी) एकता अशी लढत झाली होती. त्यावेळी एकता जिंकली आणि एकट्या तुषार चव्हाण यांना अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून चव्हाण गट सक्रि य झाला होता. त्यानंतर निमाची निवडणूक जाहीर झाली आणि एकता पॅनलने ज्येष्ठांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीने पॅनलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा खेळ आठ दिवस खेळला. त्याचवेळी आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून तुषार चव्हाण गटाने उमेदवार जुळवून उद्योग विकास पॅनल तयार करून एकताला पर्याय देऊन टाकला होता. तरीही एकता पॅनलचे श्रेष्ठी हवेतच राहिलेत. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकता पॅनलचे पूर्ण उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. अध्यक्ष आणि लघु उद्योग गटासाठीचे उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराचा घोळ संपला नाही आणि एकता पॅनलमध्ये सरळसरळ फूट पडून एका एकताचे दोन ऐकतात रूपांतर झाले. यात किशोर राठी-आशिष नहार यांचे एकता पॅनल आणि त्यांच्या विरोधात हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचेही एकता पॅनल म्हणजेच तीन पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले.  दोन्ही एकता पॅनलमध्ये कामाचा श्रेयवाद रंगला होता. या दोघांच्या भांडणात उद्योग विकास पॅनलने बाजी मारली.  पाटणकर यांच्या पॅनलचे हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले मात्र पदाधिकाºयांच्या सर्व जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्या सर्व जागा उद्योग विकास पॅनलने आपल्या ताब्यात घेतल्या आणि सिन्नरच्या जागाही काबीज करून सत्ता खेचून आणली आहे. तर बेळे गटाला ३२ पैकी केवळ तीन जागा मिळवून नाचक्की ओढवून घ्यावी लागली आहे.निमाचे प्रश्न सोडविण्याचे आव्हानसत्तेत आलेल्या उद्योग विकास पॅनलमध्ये उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजपा प्रणित एक लघुउद्योग भारतीचे नाशिक शाखेचे अध्यक्ष संजय महाजन तसेच भाजपाचे नगरसेवक शशिकांत जाधव हे निवडून आले आहेत. तर पक्षाच्या नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे असे पदाधिकारी निवडून आले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शासन दरबारी निमाचे प्रश्न सुटण्यास अडचण कशी मदत होते हे बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी