नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत शिवाय जे अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले असतील त्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपूर्ण सहकार्य करून देण्याच्या सूचना यापर्वीच भुवनेश्वरी यांनी अधिकाºयांना दिल्याआहेत.तथापि, या उपरही समितीला चौकशीत कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून त्यांनी सर्व खातेप्रमुख, सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकार, सहायक लेखाधिकारी यांनी उद्देशून पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चौकशी समितीने उपस्थित केलेले मुद्दे व माहिती पुरविणे बंधनकारक आहे. त्यामुळे समितीचे कामकाज पूर्ण होईपावेतोच्या कालावधीत कोणतेही अधिकारी व कर्मचारी मुख्यालय सोडणार नाहीत. त्याचबरोबर या कालावधीत कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा पूर्वपरवानगी- शिवाय मंजूर करू नये.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या पत्राची प्रत तत्काळ सर्व खातेप्रमुखांना रवाना करण्यात आल्या असून, रजेवर जाऊ पाहणारे व रजेवर गेलेल्या कर्मचाºयांना तत्काळ कामावर हजर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चौकशी समितीचे कामकाज किती दिवस चालेल याचा उलगडा होत नसला तरी, चौकशी समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यापूर्वी जे संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर आहेत त्यांच्या रजा तत्काळ रद्द करून त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशी समितीला आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची टाळाटाळ अथवा दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही भुवनेश्वरी एस. यांनी दिला आहे.
चौकशीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:11 AM
जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत शिवाय जे अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले असतील त्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठळक मुद्देभुवनेश्वरी : गैरहजर कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश