शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

.नर्मदा बचाव कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Published: April 16, 2015 12:30 AM

आयुक्तालयात ठिय्या : मेधा पाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांची कार्यालयात धडक

नाशिकरोड : जमिनी दाखवून पैशाची आॅफर न देता पुनर्वसन झालेच पाहिजे, सातपुड्यातील आदिवासींचे प्रश्न मार्गी लागलेच पाहिजे, आदिवासींचे स्थलांतर करून सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी अचानक विभागीय आयुक्त कार्यालयात धडक मारून ठिय्या आंदोलन सुरू केले. मुंबईला कामानिमित्त गेलेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले गुरुवारी सकाळी येणार असल्याने आंदोलनकर्त्यांनी आयुक्त कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते.नर्मदाकाठच्या आदिवासींचे स्थलांतर व विविध प्रश्नांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुठलीही पूर्वसूचना न देता विभागीय आयुक्त कार्यालयावर विविध वाहनांतून येत धडक दिली. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोपनीय शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत पाळदे हे एकटेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपस्थित होते. त्यांनी आयुक्त कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत बंद केलेले प्रवेशद्वार उघडून थेट विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या दालनासमोरील खुल्या जागेत ठिय्या मांडून घोषणा देत आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्ते आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस कर्मचारी पाळदे यांनी दरवाजा लावून धरत आंदोलनकर्त्यांना अटकाव केला. सरदार सरोवराचे बांधकाम गुजरात सरकारचा विचार करूनच वाढविण्यात आले आहे. १२२ मीटरवरून १३९ मीटरचे गेट बसविल्याने पावसाळ्यात बुडीत क्षेत्राची पातळी वाढणार आहे. महाराष्ट्रातील ३३ गावांतील सुमारे १२०० आदिवासी कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. ३५० कुटुंबांचे वसाहतीत स्थलांतर होऊनही पुनर्वसन धोरणानुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सरदार सरोवराचे काम गेल्या ८ वर्षांपासून पुढे सरकू शकलेले नाही. महाराष्ट्रातील १२०० कुटुंबे व मध्य प्रदेशातील ४० हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन बाकी आहे. जमीन दाखवा, वसाहती बसवा, स्थलांतर करा, वसाहतीत विविध सोयी-सुविधा द्या आदि विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थकांनी बुधवारी दुपारी अचानक धडक मारत ठिय्या आंदोलन सुरू केले. पुरवठा उपआयुक्त रावसाहेब बागडे, रोजगार उपआयुक्त अनिल पुरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.