शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

ठमके खुनातील संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:28 AM

प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला दशरथ बाळू ठमके (२७, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक, दिंडोरीरोड, पंचवटी) या युवकाचा खून करून मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या टाकीत फेकून देणारे संशयित गणेश वसंत गरड (२१, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके (१९, एरंडवाडी, चैतन्य म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२७, मायको दवाखान्याजवळ, पंचवटी), श्याम मधुकर बागुल (३१, रा़ गजानन चौक, सम्राटनगर, पंचवटी) या चौघांना शनिवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

नाशिक : प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला दशरथ बाळू ठमके (२७, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक, दिंडोरीरोड, पंचवटी) या युवकाचा खून करून मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या टाकीत फेकून देणारे संशयित गणेश वसंत गरड (२१, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके (१९, एरंडवाडी, चैतन्य म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२७, मायको दवाखान्याजवळ, पंचवटी), श्याम मधुकर बागुल (३१, रा़ गजानन चौक, सम्राटनगर, पंचवटी) या चौघांना शनिवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़  मयत दशरथ ठमके याच्या पत्नीचे संशयित गणेश गरडसोबत प्रेमसंबंध होते़ या कारणावरून ठमके याने गरडला समज दिल्यानंतर संतप्त झालेल्या गरड याने आपल्या तिघा साथीदारांसमवेत पार्टीच्या बहाण्याने ठमकेला शनिवारी (दि़२१) रात्री पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगतच्या मोठ्या जलकुंभाजवळ घेऊन गेले़ या ठिकाणी मद्याच्या नशेत असलेल्या ठमकेवर या चौघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ यानंतर मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी तो पाण्याच्या टाकीत टाकला़ यानंतर ठमकेच्या भावाने बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत दाखल केल्यानंतर तपासादरम्यान खून केल्याचे शुक्रवारी (दि़२७) उघडकीस आले़पंचवटी पोलिसांनी या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती़टाकीतून पाणीपुरवठा नाहीसदर मृतदेह हा महापालिकेच्या जलकुंभात नव्हे तर कृउबाच्या साठवलेल्या पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेला होता. त्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्याशी या टाकीचा संबंध नसल्याची माहिती विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी दिली.