मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेली शौचालये व इतर विकासकामांची चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. येत्या दहा दिवसात समितीकडून चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकारी एस.पी. कासार यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. तालुक्यातील गुगुळवाड येथे चौदा वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती व शौचालयांचे काम करण्यात आले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. २८२ वैयक्तिक लाभार्थींना शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे. सदर शौचालयांच्या कामांवर ३४ लाख रुपये अनुदान खर्च झाले आहे. सदर शौचालयांचे काम निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले असून, वापरायोग्य नाही. या कामांसह इतर कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी आर.डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सोमवारी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ झाली होती. मालेगाव तालुक्यातील गुगुळवाड येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती व शौचालयांचे काम करण्यात आले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. २८२ वैयक्तिक लाभार्थींना शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे. सदर शौचालयांच्या कामांवर ३४ लाख रुपये अनुदान खर्च झाले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:04 AM