शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मुद्रांक शुल्क आकारणी शिवसेना हाणून पाडेल

By admin | Published: May 18, 2017 12:53 AM

सुभाष देसाई : कुटुंबात कटुता होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने घरगुती मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारात मुद्रांक शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय शिवसेना हाणून पाडेल, अशी घोषणा शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रक्ताच्या नातेवाइकांना मालमत्ता बक्षीसपत्राने वा देणगीने देताना यापूर्वी पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या आधारे दान करता येत होती, सरकारने या निर्णयात बदल करून यापुढे दान वा बक्षीसपत्राने मालमत्ता देण्यासाठी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून सरकारला वार्षिक तीनशे कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाई यांनी, शिवसेनेचा सरकारच्या या निर्णयाला विरोध असून, रक्ताच्या नात्यात मालमत्ता हस्तांतरण अथवा दान देण्याच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाला मागे घेण्यास भाग पाडेल, अशी घोषणा केली.कौटुंबिक संबंधांना अपशकुनसरकारचा हा निर्णय म्हणजे कौटुंबिक संबंधांना अपशकुन केला जातो की काय असे वाटू लागले असून, एकत्रित कुटुंब पद्धतीच्या भावनेला खो घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. एकीकडे तीनवेळा तलाकला विरोध दर्शवायचा व दुसरीकडे अशा प्रकारची शुल्क आकारणी करून कुटुंब विघटन करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.