शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्ह्यातील खडी क्रशर थकबाकीपोटी बंद

By admin | Published: March 08, 2016 11:43 PM

२२ कोटींची थकबाकी : दर आकारणीवरून तिढा

 नाशिक : खाणीतून दगडाचे उत्खननावर गेल्या दोन वर्षांपासून रॉयल्टी (स्वामित्वधन) भरणाऱ्या क्रशरचालकांनी वापरलेल्या वीज युनिटच्या आधारे रॉयल्टी भरावी, असा आग्रह धरीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सुमारे सव्वाशे क्रशरचालकांकडे २२ कोटींची थकबाकी काढली; परंतु ही थकबाकी भरण्यास क्रशरचालकांनी नकार दिल्याने प्रशासनाने क्रशर बंद करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अगोदरच मंदीच्या तडाख्यात सापडलेला असताना, आता क्रशरही बेमुदत बंद झाल्यामुळे खडीची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात नाशिक व मालेगाव या तालुक्यांत सर्वाधिक दगड खाणी व क्रशरची संख्या असून, यापूर्वी काही क्रशरचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे रॉयल्टीची रक्कम भरून दगडाचे उत्खनन व त्यानंतर खडीचे क्रशर करण्याच्या (पान ७ वर)रीतसर अनुमत्या घेतल्या आहेत. परंतु आता प्रशासनाने उत्खननाऐवजी क्रशर करताना वापरल्या जाणाऱ्या वीज युनिटच्या आधारे रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: १९ युनिट वीज वापरावर एक ब्रास खडी तयार होत असल्याचा आधार मानून प्रशासनाने सर्व क्रशरचालकांची वीज देयके गोळा केली व त्यापोटी सरासरी प्रत्येकाकडे पन्नास लाख ते एक कोटी रुपयांची थकबाकी काढली आहे. जिल्ह्णातील क्रशरचालकांची संख्या व त्यांनी वापरलेली वीज याचा ताळमेळ पाहता, साधारणत: २२ कोटी रुपयांची थकबाकी शासकीय दप्तरात दिसत आहे. ही थकबाकी भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वीच क्रशरचालकांना नोटिसा देऊन आवाहन केले होते; परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने रॉयल्टी आकारण्याबाबत वीज युनिटचा घेतलेला आधार क्रशरचालकांनी अमान्य करून साधारणत: ३० ते ३५ युनिट वीज एका ब्रास खडी क्रशरसाठी लागत असल्याचा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे प्रशासनाने पैसे भरण्यासाठी दिलेली नोटिसीची मुदत टळून गेल्याने अखेर सर्व क्रशर बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.