मालेगाव:- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला काळया यादीत टाकण्याची नोटीस बजावून नवीन शहर स्वच्छतेचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या आॅनलाईन बैठकीत मंजुरी दिली आहे. हंगामी सभापती निलेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वाटर ग्रेस कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्याचा विषय चर्चेला ठेवला गेला होता. या विषयावर स्थायी समितीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कंपनीला नोटीस बजावण्यात बजावण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन ठेका देण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीत अन्य दोन विषयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस व विभाग प्रमुख उपस्थित होते.