शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

‘स्थायी’च्या बैठकीत ‘दीपावली मिलन’विरोध मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 4:41 PM

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील बैठकीत इतिवृत्त मंजुरीवरून सभात्याग करतानाच सभापतींच्या निर्णयाविरुद्ध नगरसचिवांकडे पत्र देत एल्गार पुकारणाºया दहा सदस्यांचा विरोध सोमवारी (दि.९) झालेल्या सभेत मावळला आणि सभापतींनी इतिवृत्तास दुरुस्तीसह मंजुरी दिल्याने ‘दीपावली’ मिलनही झाले.दि. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही सभांची इतिवृत्ते ...

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील बैठकीत इतिवृत्त मंजुरीवरून सभात्याग करतानाच सभापतींच्या निर्णयाविरुद्ध नगरसचिवांकडे पत्र देत एल्गार पुकारणाºया दहा सदस्यांचा विरोध सोमवारी (दि.९) झालेल्या सभेत मावळला आणि सभापतींनी इतिवृत्तास दुरुस्तीसह मंजुरी दिल्याने ‘दीपावली’ मिलनही झाले.दि. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सभापतींनी त्याची दखल न घेतल्याने विरोधकांनी गोंधळ घातला होता. याशिवाय, काही प्रस्तावांनाही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, त्यालाही सभापतींनी दाद न दिल्याने शिवसेना, राष्टÑवादी व अपक्ष सदस्यांनी सभात्याग केला होता. त्यानंतर स्थायी समितीतील शिवसेनेचे सदस्य सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, अपक्ष मुशिर सय्यद, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासह भाजपाचे मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांनी आपल्या स्वाक्षºयांचे पत्र नगरसचिवांना देत काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनीही सभापतीविरुद्ध विरोधकांशी हातमिळवणी केल्याने त्याची गंभीर दखल पक्षस्तरावर घेतली गेली होती. त्यातून शहराध्यक्षांनी चारही भाजपा सदस्यांना समज दिली होती. दरम्यान, सोमवारी (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा मुशिर सय्यद यांनी ‘त्या’ पत्राचे स्मरण सभापतींना करून दिले असता सभापतींनी तत्काळ सदर इतिवृत्त दुरुस्तीसह मंजूर करत असल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला आणि सभा खेळीमेळीत पार पडल्याचा आनंदही आयुक्तांसमोर व्यक्त केला. या साºया घटनाघडामोडीत नेमके कोण पाऊल मागे घेतले, याचा उलगडा झाला नसला तरी ‘दीपावली’ मिलन झाल्याची चर्चा मात्र रंगली होती.