खर्डे : दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देवळा तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघात किमान आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ उपस्थित होते. आधारभूत किमतीत खरेदी करण्यात येणाऱ्या मक्याची सहकारी खरेदी - विक्र ी संघात दि. २१ मेपासून आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज दहा मका उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी मोबाइलवर मेसेज पाठवून बोलाविण्यात आले होते. यावेळी बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष चिंतामण आहेर, व्हा. चेअरमन संजय गायकवाड, संचालक योगेश आहेर, अमोल आहेर, जितेंद्र आहेर, सुनील देवरे, महेंद्र आहेर, बापू आहेर, अतुल आहेर, कैलास देवरे, नारायण जाधव, रवींद्र जाधव, डॉ. किरण आहेर, सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते.
देवळा येथे मका खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:02 PM