लासलगाव : खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात मिरची, टॉमेटो व इतर भाजीपाला खरेदी सुरू करावी या मागणीचे निवेदन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.खडक माळेगाव नजीक वनसगाव,शिवडी,थेटाळे,सोनवाडी,सारोळे रानवड,सावरगाव,देवगाव,दरसवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची,टोमॅटोचे क्षेत्र वाढलेले आहे. या भागात या शेतमालाच्या अधिकृत बाजार समितीचे खरेदी- विक्र ी केंद्राची सुविधा नसल्याने या गावामध्ये शिवार खरेदी करून शेतकºयांची लुट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत चालला आहे. त्या अनुषंगाने लासलगाव बाजार समितीमार्फत या सर्व भागात केंद्रबिंदू असलेल्या खानगाव,खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात भाजीपाल्याचा लिलाव सुरु करून शेतकºयांना दिलासा द्यावा तसेच या ठिकाणी बाजार समितीचे अधिकृत खरेदी विक्र ी केंद्र सुरु झाल्यास परिसरातील शेतकºयांची सोय होणार आहे.या परिसरातील शेतकºयांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून लासलगाव बाजार समिती व प्रशासनाकडे यासंदर्भात मागणी केली जात आहे. याप्रसंगी विकास रायते,वसंत शिंदे,गोकुळ शिंदे,राकेश रायते,नानासाहेब शिंदे उपस्थित होते.
द्राक्षमणी लिलाव आवारात भाजीपाला खरेदी सुरु करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 9:26 PM
लासलगाव : खडक माळेगाव द्राक्षमणी लिलाव आवारात मिरची, टॉमेटो व इतर भाजीपाला खरेदी सुरू करावी या मागणीचे निवेदन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देखडकमाळेगाव : परिसरातील शेतकऱ्यांची मागणी