वणी : जगदंबा देवी चैत्रोत्सवास प्रारंभ झाला असुन अमावस्येपर्यत सुरू राहणाऱ्या उत्सवात विविध ठिकाणचे भाविक हजेरी लावतात. सप्तशृंगी देवीची ज्येष्ठ भगिनी म्हणुन जगदंबा देवी परिचित आहे. गडावरील यात्रेची सांगता झाल्यानंतर जगदंबा देवीच्या यात्रेस प्रारंभ होतो. निंब नेसविणे, जाऊळ काढणे, नवस फेडणे असे कार्यक्र म भाविक वर्गाकडुन करण्यात येतात. नऊवार साडी, एक मीटर चोळी, डोक्यावर चांदीची छत्री, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसुत्र व इतर अलंकार असे सुशोभीकरण त्यात फुल व रांगोळीची सजावट यामुळे देवीचे रूप खुलुन दिसते. भाविकांसाठी प्रसादालय, पिण्याचे पाणी निवास व्यवस्था अशा सुविधांचे नियोजन आहे. गडावरील नवस जगदंबे पुढे फेड़ता येतो, मात्र जगदंबेपुढे मानलेला नवस जगदंबेपुढे फेडावा लागतो अशी मान्यता असल्याने त्या परंपरेस अनुसरून भाविकांची वर्दळ दिसुन येते. दरम्यान, मनोरंजनाची साधने व व्यावसायिकांनी लावलेल्या दुकानांमुळे वातावरण निर्मिती होते आहे. दरम्यान, प्रतिदिन विशेष महापुजा, अभिषेक, मध्यान्ह आरती, नैवेद्य सायंकाळी आरती व इतर धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
जगदंबा देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:10 PM