नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण, उपमहापौर गुरुमित बग्गा उपस्थित होते. येत्या ८ तारखेपर्यंत शहर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ सकाळी ८ वाजता राजीव गांधी भवन येथे करण्यात आला. या मोहिमेत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. यासाठी कविता राऊत, चिन्मय उदगीरकर, डॉ. हितेंद्र महाजन, महेंद्र महाजन, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, शिशिर शिंदे, प्रसाद पवार, अशोक दुधारे या नऊ जणांची स्वच्छतादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनीदेखील स्वच्छता अभियान राबविले. पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतीत स्वच्छता करण्यात आली. यावेळी आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. स्वच्छतेबाबत जनजागृतीचा निर्धार करण्यात आला.
शहरात स्वच्छता सप्ताह सुरू
By admin | Published: October 02, 2016 11:48 PM