सटाणा : तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट असून दररोज चार हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल इतकी कारखान्याचे क्षमता आहे. यंदा उसाचा साखर उतारा वाढल्यास इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रति टन उसाला जास्त भाव देण्यात येईल असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष शंकर सावंत यांनी दिले.द्वारकाधीश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच उसाची मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला.त्याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष सावंत बोलत होते. कारखाना कार्यक्षेत्रातील एकरी शंभर मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणार्या व जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणार्या पाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन व मोळी टाकून गळीताचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या वतीने उसाचे विक्र मी उत्पादन घेणाºया सन्मान चिन्ह व रोख स्वरुपात बक्षिस देण्यात आले. ब्राम्हणगाव येथील सीमा भास्कर अहिरे या एकरी १०८ मेट्रिक टन उत्पादन घेणाºया महिला शेतकºयाने आपले अनुभव सांगितले.उसाचे विक्र मी उत्पादन घेणे हे केवळ कारखान्याच्या धोरणामुळेच शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डांगसौंदाणे येथील गणेश देशमुख , कळवण तालुक्यातील कळमथे येथील बाळासाहेब शिरसाठ या शेतकºयांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यंदा कारखान्याच्या ऊस विकास योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी होऊन किमान पन्नास ऊस उत्पादक शेतकरी एकरी शंभर टन उत्पादना प्रयत्न पोहचतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.याप्रसंगी कारखान्याचे संचालक कैलास सावंत ,चंद्रकला सावंत , कार्यकारी संचालक सचिन सावंत ,के.पी.जाधव ,सुभाष कांकरिया ,पोपट अहिरे , सरला अहिरे आदी शेतकरी उपस्थित होते.
द्वारकाधीश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:27 PM