नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक ३७ वर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळेच शासनाची वाट न पाहता नांदगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून या राज्यमार्गाच्या खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया सर्वच मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खड्डे पडल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची पूर्ण दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा असलेला ब्रिटिशकालीन दारणा धरणाला जोडणारा साकूर ते व्हीटीसी फाटा हा सात वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राज्यमार्ग क्रमांक ३७ ला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या भागात असलेल्या साकूर, नांदगाव बुद्रुक, अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे आदी गावांच्या दृष्टीने व नाशिक तसेच घोटी येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. याप्रसंगी किरण पागेरे, प्रवीण आवारी, रतन पागेरे, साहेबराव कोकणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.रस्त्यावर हिंस्रश्वापदांचा वावरसाकूर रस्त्यावर नेहमीच हिंस्र श्वापदांचा वावर असल्याने पथदीपांची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नांदगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांना तसेच परिसरातील नागरिकांना या रस्त्याला पडलेल्या खड्डे येथील ग्रामस्थांनी शासनावर अवलंबून न राहता स्वत:च पुढाकार घेऊन लोकसहभागातून सदर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
लोकसहभागातून खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 9:42 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक ३७ वर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळेच शासनाची वाट न पाहता नांदगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून या राज्यमार्गाच्या खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.
ठळक मुद्देसाकूर रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष