शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दोडीत म्हाळोबा यात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Published: February 21, 2016 9:44 PM

मुखवटा मिरवणूक : कावडीधारकांकडून गंगेच्या पाण्याने महाराजांचे अभ्यंगस्नान

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून ४०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रेच्या रविवारी सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेले गंगेचे पाणी व पंचामृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सुरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रुक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चालेल्या मिरवणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे ४०० बोकडांचा बळी देण्यात आला. यावेळी म्हाळोबा महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला.बोकडबळीसाठी म्हाळोबा महाराज यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. मंदिरास रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांची देवभेट घडविली जाते. बोकडबळी वधगृहातच देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून, दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.