पेठ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९ मधील तरतुदीनुसार समाजातील आर्थिकदुर्बल घटकांतील पालकांनाही आपल्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार असून, यासाठी शिक्षण हमी कायद्यान्वये मोफत २५ टक्के प्रवेश इंग्रजी शाळांना सक्तीचे करण्यात आले आहेत. दिनांक १० फेब्रुवारीपासून या प्रवेश प्रक्रि येला प्रारंभ झाला असून, आॅनलाइन पध्दतीने प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.नाशिक जिल्ह्यत २५ टक्के प्रवेशासाठी ४६६ शाळा पात्रअसून त्यामध्ये ६ हजार ५८९ जागांवर मोफत प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याची माहिती प्राथमीक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांनी दिली. नामांकित इंग्रजी शाळांमध्ये सर्वानाच शिक्षण घेण्याचा अधिकार असल्याने शिक्षण कायद्यात शासनाने आर्थीकदृट्या दुर्बल व वंचीत घटकांतील बालकांसाठी अशा शाळांमध्ये पहील्या वर्गात मोफत २५ टक्के प्रवेश देण्यासाठीची योजना हाती घेतली आहे.या प्रक्रि येत पारदर्शकता यावी, यासाठी प्रवेशअर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. या शाळांची नोंदणी सुरू होऊन ही प्रक्रि या सुरु झाली आहे.नाशिक जिल्ह्यात ४६६ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ८५८९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पालकांमध्ये आधीच नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची उत्सुकता असल्याने प्रक्र ीया सुरु होताच जवळपास २ हजार पालकांनी प्रवेशांची नोंदणी केली आहे. राखीव जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास दाखल झालेल्या नोंदणी अर्जातून सोडतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळा निश्चित करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत आॅनलाईन नोंदणी सुरु राहणार आहे. त्यानंतर प्रवेश सोडतीचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक सोडतीनंतर उर्वरीत जागा, शाळा आॅनलाईन दिसणार आहेत.पालकांनी नजीकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी या पालकांची कागदपत्र जुळवाजुळ करण्यासाठी धावपळ वाढली आहे. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे विविध आरक्षण असलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांना पहीलीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील पालकांना पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाची अट नाही. मात्र अन्य संवर्गातील पालकांना एक लाख रु पयाच्या आतील उत्त्पानाचा दाखला गरजेचा आहे. अधिकाधिक पालकांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या पाल्यांचा नजीकच्या इंग्रजी शाळेसाठी प्रवेश अर्ज आॅनलाईन नोंदणी करावा.- डॉ. वैशाली झणकर ,प्राथमीक शिक्षणाधिकारी, नाशिक.
इंग्रजी शाळेत दुर्बल घटकांच्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:52 AM