नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रेच्या तयारीला मंगळवारी पंचाच्या हस्ते महाआरती करून सुरुवात करण्यात आली.देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास बुधवार (१३ मार्च) प्रारंभ होत आहे. दि.१३ मार्चला पहाटे मूर्ती अभिषेक, ९ वाजता मांडव डहाळे, सायंकाळी तकत मिरवणूक व १४ मार्चला दुपारी कुस्त्यांची दंगल देवळालीगाव कुस्तीच्या मैदानात होणार आहे.यात्रेच्या तयारीनिमित्त मंगळवारी पंच कमिटीचे अध्यक्ष अॅड. शांताराम बापू कदम यांच्यासह पंचाच्या हस्ते नारळ वाढवून महाआरती करण्यात आली. यावेळी बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, सूर्यभान घाडगे, रुंजा पाटोळे, दगू खोले, संतोष खोले, राजाराम भागवत, शिवाजी लवटे, राजू गायकवाड, कैलास चव्हाण,विकास बोराडे, संपत खोले, सुरेश खोले, काशीनाथ खोले, सुनील गायकवाड, हेमंत गोसावी, तुषार फडोळ, पुजारी संतोष माळवे आदि उपस्थित होते.
देवळालीगावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:33 AM