नाशिक : वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘हरिहर भेट’ सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.९) कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच विविध कार्यक्रम मंदिर परिसरात घेण्यात आले.देवदिवाळी म्हणून कपालेश्वर महादेवाच्या भेटीला सुंदरनारायण मध्यरात्री येत असतात. शंकराला तुलसीदलार्पण आणि विष्णुला बिल्वपत्र अर्पण करण्यात येऊन हा हरिहर भेट सोहळा पूर्ण होतो. या उत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळपासूनच करण्यात आला. उत्सवाचे हे १९ वर्ष आहे. यानिमित्त सकाळी मंदिराच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रामकुंडावर महादेवाच्या मुकुटास महाअभिषेक करण्यात आला. यानंतर पालखी मिरवणूक पंचवटी कारंजावरून मंदिरात आली. मिरवणुकीत सुमारे ५०० ते ६०० भाविकांनी सहभाग घेतला होता. यानंतर रात्री साडे दहा वाजता कपालेश्वर मंदिरात शंकराच्या पिंढीला शृंगार करून महाआरती करण्यात आली. यासाठी महादेवाला पंचामृताचा महाअभिषेक करून शृंगार मुकुट, फुलांची आरास व आराधना करण्यात आली होती. यावेळी मंदिराचे पुजारी अतुल शेवाळे, अनिल भगवान, साहेबराव गाढे, हेमंत गाढे, अविनाश गाढे, कुंदन जगताप आदी उपस्थित होते.मंदिर परिसरातून पालखी मिरवणूकमंदिरात विष्णुयागास प्रारंभ करण्यात आला. यागप्रसंगी भाविकांनी महादेवाचा जप करत आराधना केली. तसेच दुपारी मंदिर परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. कपालेश्वर मंदिर ते कालिमा चौक, शनि चौक, सरदार चौकातून रामकुंडावर आणण्यात आली.
हरिहर भेट उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:22 AM
वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘हरिहर भेट’ सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.९) कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच विविध कार्यक्रम मंदिर परिसरात घेण्यात आले.
ठळक मुद्देकपालेश्वर मंदिर ट्रस्ट : विविध धार्मिक कार्यक्रम