मनमाड : येथे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. येथील महात्मा गांधी विद्यामंंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा दि.१८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत होत आहे. गुरुवारी परीक्षेच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजेपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. मनमाड महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात प्रविष्ट होणाऱ्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विषयांची परीक्षा मनमाड महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसराच्या आत झेरॉक्स दुकान तसेच एसटीडी बूथ बंद ठेवावे तसेच विद्यार्थ्यांनी वह्या, पुस्तके, गाईड्स, मोबाइल, पेजर, कॅलक्युलेटर तसेच इतर साहित्य परीक्षा केंद्रात आणू नये, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. डी. जी. जाधव, केंद्रसंचालक बी. डी. काकडे यांनी केले आहे. (वार्ताहर)परीक्षा केंद्रांवर मनमाड पोलीस ठाण्याचे पो. नि. भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
बारावीच्या परीक्षेला प्रारंभ
By admin | Published: February 18, 2016 10:25 PM