निफाड : नैताळेकरांचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. १०) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सकाळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, खासदार भारती पवार, खान्देशरत्न अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांची महापूजा करण्यात आली तर याच मान्यवरांच्या हस्ते रथपूजा करून रथ मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय बनकर, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रीती बोरगुडे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी सुराशे, राजेंद्र मोगल, दिगंबर गिते, अकबरभाई शहा, लासलगाव बाजार समितीचे संचालक शिवनाथ जाधव, सुभाष कराड, वैकुंठ पाटील, रमेश पालवे, किरण निरभवने, सारोळे खुर्दचे सरपंच दत्तात्रय डुकरे, निसाकाचे माजी संचालक रावसाहेब रायते, श्रीरामनगर सोसायटीचे अध्यक्ष भीमराज काळे, निमगाव (वाकडा)चे सरपंच मधुकर गायकर, वनसगावचे सरपंच उन्मेश डुंबरे, निफाडचे नगरसेवक दिलीप कापसे, रावसाहेब गोळे, संदीप गारे, नैताळेच्या सरपंच मनीषा डावखर, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यात्रेत असंख्य दुकाने लावण्यात आली असून, पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी मतोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.श्री मतोबा महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष केदू बोरगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.आरोग्य कर्मचारी नियुक्तयात्रोत्सव काळात कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका व आरोग्य कर्मचारी तसेच नव्याने १७ आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत.यात्रोत्सवात कोणतीही शांतता भंग होणार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.नैताळे ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा परिसरात सफाई कामगार नेमन्यात आले आहेत तसेच भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहेत.
मतोबा महाराज यात्रेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:04 PM
नैताळेकरांचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. १०) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
ठळक मुद्देनैताळे : पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची हजेरी