पंचवटी : शनिचौकातील श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कार्तिक स्वामी मंदिरात शुक्र वारी (दि. ३) कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवास प्रारंभ झाला.सकाळी कार्तिक स्वामी मूर्तीचे पूजन, त्यानंतर अभिषेक करण्यात येऊन दुपारी महाआरती करण्यात आली. दुपारी पौर्णिमेला प्रारंभ झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. पौर्णिमा शनिवारी सकाळी १०.५३ वाजेपर्यंत असल्याने तसेच रविवारी (दि. ५) पहाटेपासून कृत्तिका नक्षत्र सुरू होत असून, रविवारी रात्री १० वाजून ३१ मिनिटापर्यंत कृत्तिका नक्षत्र असल्याने भाविकांना तीन दिवस दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. शुक्र वारी सकाळी कार्तिक स्वामी मंदिरात मंदिर विश्वस्तांच्या हस्ते देवाला दूध, दही, ऊस, नारळ, रस आदींसह विविध फळे तसेच द्रव्यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्य पूजन आटोपल्यावर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना पूर्व दरवाजाने आत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात पूजा साहित्याची विक्र ी करणाºयांनी दुकाने थाटल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कार्तिक स्वामी महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:25 AM