नाशिक : खादी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी खादीच्या कपड्यावर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व गांधी जयंतीच्या निमित्ताने दिली जाणारी रिबीट योजना पुन्हा सुरू करावी, यासह खादीच्या कपड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी हटविण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघाच्या बैठकीत करण्यात आली आहे.नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंगल कार्यालयात शनिवारी (दि.१५) खेळीमेळीत पार पडली. संघाचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत व्यासपीठावर शंकर बर्वे, मालिनी कंसारा, अंजली आमले, मकरंद सुखात्मे, रमेशचंद्र घुगे, दिलीप मोरे, काशीनाथ निमसे, कै लास सोनवणे, प्रमोद गर्गे, केदारनाथ सूर्यवंशी, अजय तांबट, परशुराम वाघेरे उपस्थित होते.बैठकीला उपस्थित प्रमुख पाहुणे खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोरही संघाच्या जुन्या जागेसंबंधीच्या प्रश्नांसह सभासदांनी व संचालक मंडळांनी खादी व ग्रामोद्योगासमोर असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी गोडसे यांनी संचालक मंडळास खादी ग्रामोद्योगांच्या रिबीट व सीएसटीसंदर्भातील मागण्या संसदेत मांडण्यासोबतच जागेचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, नफा वाटणीच्या विषयावर सभासदांनी नफ्याची ४२ हजार २३६ रुपयांची रक्कम संघाच्या इमारत निधीत वर्ग करण्याच्या निर्णयाला मंजुरी देतानाच अध्यक्षांच्या परवानगीने अजेंड्यावरील विषयांसह ऐनवेळी आलेल्या सर्व विषयांना सभासदांनी व संचालक मंडळाने मंजुरी दिली.
खादीवरील रिबेट योजना सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 1:07 AM
खादी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी खादीच्या कपड्यावर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व गांधी जयंतीच्या निमित्ताने दिली जाणारी रिबीट योजना पुन्हा सुरू करावी, यासह खादीच्या कपड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी हटविण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
ठळक मुद्देखादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या बैठकीत ठराव