चांदवड पोस्ट ऑफिसचे निरीक्षक राजेंद्र वानखेडे, पोस्टमास्तर अरुण चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दत्तू चव्हाण, चिंधू चव्हाण, रईस पटेल, साहेबराव जाधव, विवेक मोड, पोपटराव गोडसे, सुदाम आहेर, वसंत देवरे यांनी या मोहिमेंतर्गत नागरिकांना घरपोच आधार-मोबाइल लिंक करण्यासाठी सुविधा मालेगाव विभागात सुरू करण्यात आल्याची माहितीची पत्रके वाटली. सदर मोहीम दि. २३ ते २८ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक ही लोकाभिमुख बॅंक असून, प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात डाक विभागाने घरपोच अदा केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सोयीमुळे नागरिकांना घरपोच त्यांच्या आधारला मोबाइल क्रमांक लिंक किंवा अपडेट करता येणार आहे. किंवा पूर्वीचा मोबाइल क्रमांक बदलून घ्यावयाचा असल्यास तोदेखील बदलून मिळणार आहे. ही सेवा घरपोहच डाक विभागाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.