लासलगाव : सध्या निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम जोरात सुरू असून, द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाºया द्राक्षमण्यांना स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी त्यांचे द्राक्षमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी - विक्री केंद्रावरच विक्रीस आणावे, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.उगांव येथील द्राक्षमणी लिलाव शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव पानगव्हाणे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी क्रेटस्चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर ३९ क्रेट्समधून आलेल्या द्राक्षेमण्यांची कमीत कमी १२ रुपये, जास्तीत जास्त रु. २७ रूपये व सर्वसाधारण २५ रुपये प्रतिकिलो या दराने विक्र ी झाली. यावेळी क्षीरसागर यांनी सांगितले, उगांव व परिसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. २६ जानेवारी २००४ पासून उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षमणी लिलावास सुरुवात केली होती. गेल्या १४-१५ वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतकºयांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शेतकºयांच्या शिल्लक द्राक्षमण्यांना चांगला भावसुद्धा मिळत असून, शेतकºयांची होणारी फसवणूकही टळली जात आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. या प्रसंगी द्राक्षे उत्पादक शेतकरी संदीप पानगव्हाणे, ज्ञानेश्वर ढोमसे, विजय पानगव्हाणे, सोमनाथ मापारी, संजय वाबळे, द्राक्षमणी खरेदीदार कृष्णकांत मापारी, प्रमोद राठी, दिलीप साबळे, मोहन ढोमसे, रावसाहेब घुमरे, राजाराम मापारी, किरण वाढवणे, नामदेव मापारी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.दरवर्षी कोट्यवधींची उलाढालशेतकºयांच्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्ष हंगामात उगाव, नैताळे, विंचूर, लासलगाव, खानगाव नजीक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उगांव येथे दरवर्षी द्राक्षमण्यांच्या खरेदी-विक्र ीतून अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. द्राक्षमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षमणी विक्र ी न करता सदर खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षमणी विक्र ीस प्राधान्य देत आहे.