शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

म्हाळोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:49 AM

दोडी बुद्रुक : मुखवटा व पालखी मिरवणूकनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस रविवारपासून (दि.१७) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ३०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.

ठळक मुद्देयात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात.

दोडी बुद्रुक : मुखवटा व पालखी मिरवणूकनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस रविवारपासून (दि.१७) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ३०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. शनिवारी रात्री सुमारे २०० ते २५० भाविकांनी निफाड तालुक्यातील तामसवाडी येथून गोदावरीचे पाणी आणले. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेल्या गंगेचे पाणी व पंचमृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सुरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रूक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकांत महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चाललेल्या मिरणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची दुपारी १२ वाजता स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे ३०० बोकडांचा बळी देण्यात आला.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची मिरवणूक होऊनत्यांची देवभेट घडविली जाते. राज्यभरातून येथे सुमारे शंभरच्या आसपास देवकाठ्या येतात.तळेगाव येथील मानाची काठी पाऊल टेकडीपासून मंदिरापर्यंत काठीची देवास भेट घडविली जाते. रात्री पटंगणावर शोभेची दारू व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्रभर भगत मंडळी डफाच्या तालावर देवाची गाणी म्हणतात. बोकडबळी वधगृहातच देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहे. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडीले व वावीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपनिरीक्षक व सुमारे ४० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काटेकोर बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहीका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात्रोत्सव पार पडण्यासाठी समितीचे पाराजी शिंदे, मारूती शिंदे, सुभाष शिंदे, भारत शिंदे, कारभारी शिंदे, माधव शिंदे, कचरु शिंदे, रतन शिंदे, जानकू शिंदे, शिवाजी शिंदे, रायभान शिंदे, मल्हारी शिंदे, चंद्रभान जाधव, किसन शिंदे, बापू शिंदे, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब शिंदे आदिंसह यात्रा उत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.गावातून मुखवट्याची मिरवणूकतीन दिवस चालणाºया यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त मंडळींकडून कावडीद्वारे गंगेचे पाणी आणून म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर गावातून मुखवट्याची मिरवणूक काढून विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली.