पांगरी : दुधाला भाव मिळावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारपासून पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार व शाखाध्यक्ष बारकू पगार यांच्या नेतृत्वाखाली महादेव मंदिरातील पिंडीवर दुग्धाभिषेक करून मुंबईचे दूध बंद करण्याच्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. या बैठकीत पगार यांनी घोटी येथे जाऊन दूध रोखण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाच रुपये अनुदान मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सरकारने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी अन्यथा एकही टॅँकर मुंबईला जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शांताराम पगार, विश्वनाथ पगार, संपत पगार, विलास निरगुडे, निवृत्ती गारे, राजेंद्र घोटेकर, भाऊसाहेब घोटेकर, रमेश पगार, कृष्णा घुमरे, निलेश सापनर, सागर सोनवणे आदींसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने रविवारी रात्रीपासूनच निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, उपनिरीक्षक मुक्तार सैयद, प्रकाश उंबरकर, रामनाथ देसाई, रमेश सदगीर, संदीप शिंदे, उमेश खेडकर आदींसह २५ दंगा नियंत्रण पोलिसांसह बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पांगरी येथे दुग्धाभिषेक करून दूध बंद आंदोलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:31 AM