कवडदरा : कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पुर्णत: उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी किसान संघटनेकडून होत आहे.केंद्र व राज्य सरकार कोव्हिडच्या नावाखाली शेतकरी व शेतमजूरांच्या विरोधात अन्यायकारक आदेश काढत असून ते तातडीने मागे घ्यावेत. तसेचशेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा, गायीच्या दुधाला ३५ रूपये लीटर व म्हशीच्या दुधाला ६० लीटर हमी भाव मिळावा, मनरेगा अंतर्गत २०० दिवसांचा रोजगार मजूरांना मिळावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, डिझेल-पेट्रोल दरवाढ त्वरीत मागे घ्यावी आदी विविध मागण्या शेतकरी संघटनेच्यावतीने येथील शेतकरी संघटनेचे सदस्य सतिष निसरड, रवी रोंगटे यांनी केल्या आहेत.
शेतमजूरांना पेन्शन सुरू करा शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 9:14 PM
कवडदरा : कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पुर्णत: उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी किसान संघटनेकडून होत आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा