सटाणा : राज्य सरकारने शेतमाल अडतमुक्त करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याविरु द्ध व्यापाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पुकारल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाचा जो निर्णय होईल तो होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना वेठीस न धरता खरेदी सुरू करावी, असे भाजपा-सेना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद देत सोमवारपासून डाळींब खरेदीस सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, अॅड. वसंतराव सोनवणे यांनी येथील बाजार समितीचे प्रशासक चंद्रकात विघ्ने, सचिव भास्कर तांबे, व्यापारी महेश देवरे, संदीप देवरे, राजू खैरनार, बापू वाणी आदि व्यापार्यांची व माथाडी कामगारांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीत डॉ. विलास बच्छाव यांनी शेतकऱ्यांची आत्ताची आर्थिक स्थिती निदर्शनास आणून दिली. आधीच शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. आपला सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अत्यंत वाईट स्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनस्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्ही मान्यच करू परंतु कर्जाच्या खाईत लोटला जाणारा शेतकरीला होत देण्यासाठी लिलाव सुरू करावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी डाळिंबाचे लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात आली . आज सुमारे साडेतीन हजार क्र ेट डाळिंबाचा लिलाव झाला. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
डाळींब लिलावास प्रारंभ
By admin | Published: July 19, 2016 12:33 AM