लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे, नळवाडी, निगडोंळ, आंबानेर, पांडाणे, मालादुमाला या परिसरामध्ये द्राक्षबागेच्या अर्ली छाटणीस सुरु वात झाली आहे.एक महिन्यापासून या परिसरातील द्राक्ष बागायदारांनी छाटणीस पूर्वतयारी करून बागांना रासायनिक खतासह जैविक खतांचे डोस दिले होते. अनेक वर्षांपासून शेतकरी लवकर छाटणी करतात. कारण त्यामुळे बाजारात द्राक्ष लवकर येऊन दर चांगला मिळतो. मात्र लवकर छाटणी केलेल्या द्राक्षबागांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या बागा परतीच्या पावसात अनेक ठिकाणी फुलोरा अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांना खूप जपावे लागते. अनेक वेळा या बागांची फळगळ, कूज मोठ्या प्रमाणात होत असते. अर्ली छाटलेल्या बागांची द्राक्ष डिसेंबर, जानेवारी महिन्यात बाजारात उपलब्घ होतात. तसेच लवकर छाटणी केलेल्या बागांना माल संपल्यानंतर विश्रांतीचा कालावधी जास्त मिळाल्यामुळे झाड सशक्त राहते.
द्राक्षबागा छाटणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:03 AM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे, नळवाडी, निगडोंळ, आंबानेर, पांडाणे, मालादुमाला या परिसरामध्ये द्राक्षबागेच्या अर्ली छाटणीस सुरु वात झाली आहे.
ठळक मुद्देविश्रांतीचा कालावधी जास्त मिळाल्यामुळे झाड सशक्त