सिन्नर : तालुक्यातील सोनेवाडी येथील युवामित्र संस्थेच्या वतीने भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्याचा शुभारंभ करण्यात आला. सोनेवाडी गावातील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी पुढाकार घेऊन युवामित्रच्या संकल्पनेतून टाटा ट्रस्ट व घरडा केमिकल्स यांच्या सीएसआर निधीतून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच जिजा पथवे तसेच भोजापूर खोरे गाळ उपसा समितीचे अध्यक्ष गणेश सुभाष रावले यांच्या हस्ते करण्यात आला. युवामित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तसेच धरणाच्या जवळ असलेल्या धुळवाड, चास, कासारवाडी, नळवाडी, दापूर, चापडगाव आदी गावांतील शक्य होईल त्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आवाहन केले. तसेच युवामित्र संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रकिया समजावून सांगून त्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच जिजा पथवे, गणेश रावले, नवनाथ कांडेकर, युवामित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे, ऋषिकेश डांगे, योगेश परदेशी, माजी सरपंच कैलास सहाणे, रवींद्र सहाणे, विक्रम देशमुख, राजाराम बुरकुल, देवकीनंदन परदेशी, मदन परदेशी, कैलास रावले, सुभाष सहाणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
---
गाळ उपसा केल्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढणार असून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील २१ गावांतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
- डॉ. चंद्रकांत हजारी, ग्रामस्थ, सोनेवाडी
------------------------
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून युवामित्र संस्थेच्या पुढाकारातून गाळ उपसण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी मनीषा पोटे, सरपंच जिजा पथवे, गणेश रावले, नवनाथ कांडेकर, प्रीतम लोणारे, ऋषिकेश डांगे, योगेश परदेशी आदी. (०१ सिन्नर २)
===Photopath===
010621\384201nsk_21_01062021_13.jpg
===Caption===
०१ सिन्नर २