नाशिक : साहित्याचा उत्सव मानल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे नाशिकमधील आयोजन थाटामाटात व्हावे, यासाठी नाशिकमधील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. शासनाकडून संमेलनाच्या अनुदानात कपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन संमेलनाच्या यशस्वितेसाठी एकप्रकारे निधी संकलनास प्रारंभ झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्हावासीयांकडून निधी संकलित केला जाणार आहे. त्यासाठी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांकडून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. यासाठीचा पहिला धनादेश गुंतवणूक सल्लागार प्रमोद पुराणिक यांनी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी संदीप फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील यांनी संयोजन समितीला दिले. नाशिक येथे होणारे हे संमेलन यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक आणि एक वेळचे भोजन संदीप फाउंडेशनच्या वतीने संमेलनात दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त देशभरातून अनेक लेखक, कलावंत नाशिक येथे येणार आहेत. बाहेरगावावरून येणाऱ्या विशेष प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था तसेच त्यांना संमेलनस्थळापर्यंत येण्या–जाण्याची व्यवस्थासुद्धा संदीप फाउंडेशनमार्फत होईल, असे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. तसेच संमेलनासाठी वैयक्तिक स्वरूपात २१ हजार रुपयांची देणगी यावेळी त्यांनी जाहीर केली. संमेलन समितीचे प्रमुख जयप्रकाश जातेगावकर, लोकहितवादी मंडळाचे सेक्रेटरी सुभाष पाटील, संजय करंजकर यावेळी उपस्थित होते. तसेच सविता आवारे यांनी ११ हजार, त्याशिवाय लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी सुभाष पाटील, संजय करंजकर, किरण समेळ, सुनील भुरे, सुरेखा बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी ५ हजार तर आशिष भन्साळी यांनी साहित्य संमेलनातील एक भोजन खर्च करण्याचे जाहीर केले.
लोगो
१५संमेलन लोगो वापरावा