नाशिक : गेले दोन दिवस गिरणारे परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने भात पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने भात पेरणीला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, परंतु दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शेतकºयांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी शेतात भात पेरणीला सुरुवात केली आहे. मशागत करून ठेवलेल्या जमिनी भात पेरणीसाठी नांगरल्या जात आहे. बियाणांसाठी खरेदी विक्री संघ आणि खासगी केंद्रावर शेतकºयांची गर्दी होत आहे.
नाशिक परिसरात भात पेरणी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:13 PM