देवळाली कॅम्प : येथील टेरॉटोरियल आर्मी ‘थलसेना’ ११६ इन्फंट्री बटालियनमध्ये सैनिक व ट्रेडमनच्या पदांसाठी रविवारी (दि. १६) घेण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेसाठी देशभरातून सुमारे अडीच हजार तरुणांनी देवळाली कॅम्पला हजेरी लावली. शनिवारपासून देशभरातील कानाकोपऱ्यातून तरुण देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले होते. लष्करी हद्दीतील आनंदरोड मैदानावर सकाळी भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला. भरतीसाठी आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा त्याचप्रमाणे दादरा-नगरहवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पॉँडेचरी येथील उमेदवारीसाठी सदर भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. सोमवारी नाशिक वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी, तर दि. १८ रोजी नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी विशेष भरती होणार आहे.
‘११६ टीए बटालियन’ भरतीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:03 AM
देवळाली कॅम्प येथील टेरॉटोरियल आर्मी ‘थलसेना’ ११६ इन्फंट्री बटालियनमध्ये सैनिक व ट्रेडमनच्या पदांसाठी रविवारी (दि. १६) घेण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेसाठी देशभरातून सुमारे अडीच हजार तरुणांनी देवळाली कॅम्पला हजेरी लावली.
ठळक मुद्देअडीच हजार युवकांचा सहभाग