नाशिक : राष्टवादी कॉँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, नाशिक शहरातून पाच हजार क्रियाशील व ५० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, गजानन शेलार, शरद कोशिरे, पद्माकर पाटील व मधुकर मौले यांचा क्रियाशील सदस्य म्हणून अर्ज भरून घेतला. पक्षाची सभासद नोंदणी अभियान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू राहणार असून, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाचा सभासद करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. सदर सभासद नोंदणी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध राहणार आहे. नाशिक शहरातून पहिल्या टप्प्यात पाच हजार क्रियाशील व पन्नास हजार प्राथमिक सदस्य करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. ज्यांना पक्षाचा प्राथमिक अथवा क्रियाशील सदस्य व्हायचे असेल तर त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेस भवन येथे सरचिटणीस संजय खैरनार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. सदरचे अभियान शहरातील प्रत्येक विभागात व चौकात राबविण्यात येणार आहे.यावेळी महिला कार्याध्यक्ष सुषमा पगारे, अंबादास खैरे, मुक्तार शेख, निवृत्ती अरिंगळे, दत्ता पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल महाले, चंद्रकांत साडे, अशोक पाटील, पूनम शहा, रंजना गांगुर्डे, सुरेखा निमसे, दादा कापडणीस, योगेश दिवे आदी उपस्थित होते.
राष्टÑवादीच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:29 AM