शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:07 PM

सटाणा : तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात हेल्मेट वापर तसेच रिफ्लेक्टरचा वापर याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, शेतकरी व व्यापारी आणि हमाल यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजायखेडा पोलिसांमार्फत हेल्मेट वापरासाठी रॅलीचे आयोजन

सटाणा : तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात हेल्मेट वापर तसेच रिफ्लेक्टरचा वापर याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, शेतकरी व व्यापारी आणि हमाल यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे.या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी हेल्मेट सक्ती बाबत माहिती दिली. हेल्मेट घालून दुचाकी चालविणे, सीटबेल्ट लावून कार चालविणे, टॅÑक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे अशा छोट्या परंतु महत्वाच्या बाबींची काळजी घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे उपसभापती लक्ष्मण पवार, संचालक कृष्णा भामरे, भाऊसाहेब अहिरे, अविनाश सावंत, भाऊसाहेब कांदळकर, संजय भामरे, दीपक पगार, हेमंत कोर, शांताराम निकम, मधुकर चौधरी, आनंदा मोरे, अविनाश निकम, दत्तू बोरसे, सचिन मुथा, चारु शीला बोरसे, चंद्रभागा शिंदे, अनिल बोरसे, दादाजी खैरनार, डॉ. दिग्पाल गिरासे, अरु ण अहिरे, शरद बोरसे, संजय पाटील आदी उपस्थित होते.हमाल करणार हेल्मेटचा जागर ...जायखेडा पोलीस ठाण्याच्या हेल्मेट वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत नामपूर बाजार समितीच्या माथाडी युनियन कामगारांनी तब्बल ८० हेल्मेटची मागणी केली आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून नामपूर गावातून हेल्मेट घालून मोटरसायक रेली काढून जनजागृती केली जाणार असल्याचे हमाल मापारी संचालक दत्तू बोरसे यांनी जाहीर केले.