वडनेरभैरव - वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या नेत्रावती नदीचे आजपर्यंत न झालेले खोलीकरण पाणी फांऊडेशन आयोजित वॉटरकप स्पर्धेत गावातील युवकांनी सहभाग नोंदविल्यांनी ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून बुधवारी काम सुरु झाले आहे. वडनेर भैरव गावाला शेतीचे मोठे क्षेत्र आहे.सधन परिसर म्हणून ओळखला जातो.पाण्याची तशी इथ टंचाई नाही मात्र भविष्याचा विचार कमी होत चाललेले पर्जन्यमान याचा विचार करता गावात जलसंधारणाची कामे व्हावीत अशी इच्छा शक्ती बाळगून एकता मित्र मंडळाच्या सदस्यांनी प्रशिक्षण घेऊन कामाला प्रांरभ केला.सप्तशृंगी पतसंस्थेचे संस्थापक अॅड.पोपटराव पवार,पंचायत समितीचे उपसभापती अमोल भालेराव यांच्या हस्ते नेत्रावती नदी खोलीकरण कामाचा प्रारंभ झाला.यावेळी उपसरपंच रावसाहेब भालेराव,पिंमको बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाटोळे,ग्रामविकास अधिकारी राकेश सूर्यवंशी , नेत्रावती पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब माळी ,स्वर्गीय अशोकराव भाऊ शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल पाचोरकर, माजी सरपंच राजाभाऊ भालेराव,बाबाजी सलादे,कैलास भालेराव,रामभाऊ पाचोरकर,संतोष पाचोरकर,अतुल गोºहे,राजू गोºहे,शशिकांत वक्ते,आबा आंबेकर,एकता ग्रुपचे संस्थापक प्रदीप माळी, अध्यक्ष सुरेश पवार, मार्गदर्शक संजय भालेराव,उपअध्यक्ष प्रदीप पाचोरकर,सागर राऊत,पद्माकर जोंधळे,अर्शद मनियार, अनिकेत पाचोरकर,सचिन आहेर,जयपाल परदेशी,सुभाष जाधव,रत्नाकर पांडव,शेखर जाधव उपस्थित होते.
वडनेरभैरवला लोकवर्गणीतुन खोलीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:07 PM