त्र्यंबकेश्वर : पेगलवाडीजवळ असणार्या सिद्धपीठ आदिनाथ आखाड्यात रुद्रमहायज्ञास उत्साहात प्रारंभ झाला. वैदिक आणि सनातन परंपरेनुसार काशीहून आलेल्या आचार्य आणि विद्वानांच्या मंत्रोच्चारात विविध प्रकारचे धार्मिक विधी येथे सुरू झालेले आहेत. आदिनाथ आखाड्याचे त्रिलोकीनाथ, शिलानाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या यज्ञादरम्यान भाविक ओम नम: शिवायचा अखंड जप करीत आहे. त्यामुळे येथे येणार्या इतर भाविकांसाठी हा प्रकार आकर्षणाचा आणि श्रद्धेचा झाला आहे. आदिनाथ आखाड्याचे भक्त बी. एन. पाठक यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठय़ा संख्येने भाविक आले असून, ते दिवसभर हरिनामाचे कीर्तन आणि दिव्यभजन करीत असल्याने आखाड्यात मंगलमय वातावरण तयार झाले आहे. ११ सप्टेंबर रोजी आदिनाथांसह विविध देवतांच्या ८४ मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, १२ रोजी सामूहिक दीपदान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे
आदिनाथ आखाड्यात रुद्रमहायज्ञास प्रारंभ
By admin | Published: September 07, 2015 10:10 PM